Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सकाळच्या सत्रात भरणार युनियनच्या मागणीला यश- रामकृष्ण बी.पाटील

0 7 6 9 4 1

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सकाळच्या सत्रात भरणार युनियनच्या मागणीला यश- रामकृष्ण बी.पाटील

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

मुंबई :- मा. आयुक्त एकात्मिक बालाविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या आदेशानुसार वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळच्या सत्रात करावी.अशी मागणी करत अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला.
त्याअनुषंगाने मा.जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी काल दि. 31 मार्च 2026 रोजी आदेशित करत जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राची वेळ दि. 1 एप्रिल 2026 ते दि. 30 जून 2026 या कालावधीत सकाळच्या सत्रात केल्याचे पत्र पारीत केले आहे.
या पत्रानुसार सेविका मदतनिसांना अंगणवाडी केंद्र सकाळी 7. 00 ते 7.15 अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करणे, 7.15 ते 8.15 पर्यंत पूर्व शालेय शिक्षण, 8.15 ते 8.30 लाभार्थीना सकाळचा नाष्टा, वाटप, 8.30 ते 10.15 पर्यंत पूर्व शालेय शिक्षण, सकाळी 10.15 ते 10.45 लाभार्थीना गरम ताजा आहार वाटप, 10.45 ते 11.30 पोषण ट्रॅकर नोंदी घेणे तसेच दप्तर लिहिणे, 11.30 ते 12.00 पर्यंत संदर्भ सेवा, 12.00 ते 01.30 गृहभेटी, आरोग्य विषयक मार्गदर्शन,समुपदेशन, कुपोषित बालकांना आहार वाटप अशी कामे करावी लागणार आहेत.
अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळच्या सत्रात कारण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला युनियनला यश आल्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून युनियनचे आभार मानले असल्याची माहिती रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे