हिंदूस्थान कॅटल कंपनी कडून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना वस्तूची भेट
हिंदूस्थान कॅटल कंपनी कडून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना वस्तूची भेट

वाळकी प्रतिनिधी : दादा आगळे
आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून अनेक उद्योग सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करतात अशीच मदत नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदुस्तान कॅटल फीड या कंपनीच्या सीएसआर फंडातून देण्यात आले.यासाठी गुंडेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुनील भापकर यांनी प्रयत्न केले असून ही मदत गुंडेगाव गावठाण जिल्हा प्राथमिक शाळा,मानेमळा प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा डब्बे व बॅग देऊन वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत गुंडेगावचे विद्यमान उपसरपंच नानासाहेब हराळ व माजी उपसरपंच सुनील भापकर,मुख्याध्यापिका शिंदे संज्योत सुमित्र.शिक्षिका गुंड सरस्वती पांडुरंग,देशमुख मॅडम, कराळे सर, सुनिता कोतकर मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अरुण भापकर,दीपक माने,किसन भापकर,रवींद्र भापकर, सुरेंद्र भापकर,संदीप कोतकर, सर्जेराव माने, सचिन माने, प्रवीण जाधव रावसाहेब जाधव, परशुराम जाधव, राघवेंद्र ठाकूर,राधेश्याम ठाकूर, मच्छिंद्र भापकर,नंदराम माने,प्रमोद पवार,दगडू हराळ मेजर,विकास देशमुख, संतोष हराळ, अशोक सोनवणे, अमोल गाढे, प्रकाश हराळ, संजय कुसळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांनी कंपनी प्रतिनिधी पठारे साहेब व अधिकारी गौंड साहेब तसेच हिंदुस्तान कॅटल कंपनीने राबविलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले..



