Breaking
ब्रेकिंग

ऋचा बोगा हिला ४४ किलो वजन गटात🏅सुवर्ण

सहारनपुर (उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड

0 7 6 9 4 3

सहारनपुर (उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी : संवेद वायकर

(इंदापूर) : पुणे येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित आंतरशालेय राज्य स्तरीय स्पर्धा २०२५-२६ घेण्यात आली. या स्पर्धेत अ.नगर येथील (१४ वर्ष खालील मुली) ऋचा बोगा हिने ४४ किलो वजन गटात🏅सुवर्ण विजेते पद मिळवून तिची सहारनपुर (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

ऋचा बोगा हिला सुवर्ण पदक मिळाले असून ती इयत्ता ९ वी मध्ये भाऊसाहेब फिरोदिया शाळेत शिकत आहे. हिला राष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर, सोनाली साबळे मॅडम तसेच पै.गणेश लांडगे, पै.शुभम दातरंगे,अथर्व नरसाळे ,गणेश शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या खेळाडूंचे नगरसेवक धनंजय जाधव, प्रा. संजय धोपावकर, लॅ कॉलेज प्राचार्य तांबे सर, भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक दुगड सर, उपमुख्याधपाक कैलास साबळे सर, योगेश वाघस्कर सर, यांच्यासह राजेंद्र बोगा, राकेश बोगा, पल्लवी बोगा, निर्मला बोगा, अमर येमूल, ज्ञानेश्वर गालपेल्ली तसेच सर्व नातेवाईकांनी व शिक्षक वृंदांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे