दिल्लीगेट शनि मारुती मंदिरा करता संपूर्ण साउंड सिस्टीम भेट
सावेडी च्या टीव्ही सेंटरच्या विघ्नहर्ता प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
दिल्लीगेट शनि मारुती मंदिरा करता संपूर्ण साउंड सिस्टीम भेट
सावेडी च्या टीव्ही सेंटरच्या विघ्नहर्ता प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
नगर-येथील दिल्लीगेट येथील पुरातन शनी मारुती मंदिरा करता टीव्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरा करता दोन साऊंड, ऍम्प्लिफायर, माईक,माईक स्टँड सह सर्व सेट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज हा सेट भेट देण्यात आला यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ सोनवणे ,सुशांत जाधव ,चंद्रकांत सबन, उदय खरमाळे ,अमित भुतकर, रमेश गाजुल, मनोज लोंढे ,शुभम आठरे ,मनोज आंबेकर, राजेंद्र येंडे ,अमोल नागपुरे ,लक्ष्मण इगे ,बाळासाहेब सांगुळे ,महेंद्र मानकर ,विठ्ठल शिरसुल ,रामलिंग अष्टेकर ,परेश पुरोहित आदी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले नवीन मंदिरे उभे राहतात पण जुन्या मंदिराकडे पण दानशूर लोकांनी लक्ष द्यावे,हरिपाठ आरती भजन यासाठी या साऊंडचा उपयोग होणार असून जर हरिपाठ चा गजर परिसरात लोकांच्या, भाविकांच्या कानावर गेला तर ते मंत्रमुग्ध होतात. अशी अध्यात्माची विचारधारा प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचली तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचा फायदा प्रत्येकाच्या कुटुंबीयांना होतो .
योगेश सोनवणे म्हणाले की मंदिराला आज साऊंड सिस्टिम दिली आहे पुढील काळात मंदिराला रंगकाम पण करून देणार आहोत तसेच मंदिराला जी काही मदत लागेल ती विघ्नहर्ता प्रतिष्ठान देण्याचे प्रयत्न करेल सावेडीतील टिव्ही सेंटर येथे असणारे हे मंडळ नवरात्र उत्सव,गणेश उत्सव , जयंती , श्री दत्त जयंतीया आदी उत्सव तसेच भाविकांना विविध धार्मिक ठिकाणी मोफत घेऊन जाते .



