Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सत्कार

0 7 6 9 4 3

अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सत्कार

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी महापौर सौ. गाडे यांना शाल व वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर अधिक स्वच्छ, हरित व प्रगत शहर घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण ठरला.

महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रम, विकासकामे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे