Breaking
ब्रेकिंग

आजपर्यंत जनतेची निस्वार्थ सेवा केली आणि यापुढेही करत राहणार:- प्रशांत ढाळे (प्रभाग क्रमांक ०६ ब चे उमेदवार)

0 7 6 9 4 3

आजपर्यंत जनतेची निस्वार्थ सेवा केली आणि यापुढेही करत राहणार:- प्रशांत ढाळे (प्रभाग क्रमांक ०६ ब चे उमेदवार)

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०१/ करमाळा शहरातुन प्रभाग क्रमांक ०६ ब मधून धनुष्यबाण या चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार प्रशांत मोहन ढाळे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असुन, त्यांनी जनतेला विश्वास दिला आहे की आज पर्यंत मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आले आहे. इथून पुढेही निरंतर समाजसेवेचे कार्य करत राहणार. मी माझ्या कामास कधी चुकलो नाही. इथून पुढेही चुकणार नाही. माझ्याकडे जे कोणी त्यांच्या समस्या घेऊन आलेले आहेत या सर्वांच्या समस्यांचे मी निवारण आजपर्यंत केलेले आहे. त्यामुळे जनतेने आजपर्यंत मला मत रुपी आशीर्वाद दिलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की इथून पुढेही जनता मला मत रुपये आशीर्वाद देऊन त्यांची सेवा करण्याची पुन्हा एकदा मला संधी प्रदान करतील असे मत प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केले.

प्रशांत ढाळे यांचा गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब करमाळा शहरात नावाजलेला आहे. सन 2000 साली गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब ची स्थापना त्यांनी केली. या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य केले. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, गरजवंतांना शैक्षणिक मदत, आरोग्य विषयक मदत असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी लोकांची मदत करत समाजसेवेचे कार्य केलेले आहे. तसेच कोरोना काळामध्ये गरजवंतांना जेवणाचे डबे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अशा तऱ्हेने प्रशांत ढाळे हे सदैव सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असतात.

प्रशांत ढाळे यांचे गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब तर्फे आयोजित दरवर्षीच्या गणेश जयंतीचे करमाळा शहरांमध्ये कौतुक होत असते. दरवर्षी गणेश जयंतीला संपूर्ण करमाळा शहराला त्यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप होत असते. तसेच दहा दिवसांच्या गणपती महोत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश असतो व सर्व जाती धर्माच्या लोकांना गणपतीची आरती घेण्याचा मान मिळतो. यामुळे त्यांच्या गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब मध्ये सर्व धर्म समभाव याप्रमाणे सामाजिक एकता व बांधिलकी पहावयास मिळते.

यावेळी सुद्धा मला जनतेन पुन्हा एकदा मत रुपी आशीर्वाद दिले तर आपण निरंतर जनतेची सेवा करू व करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध असु असे आश्वासन प्रशांत मोहन ढाळे यांनी नागरिकांना दिले आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे