ज्ञानसंपदा शाळेत गणित व भूगोल विषयावर वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

ज्ञानसंपदा शाळेत गणित व भूगोल विषयावर वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

प्रतिनिधी : संवेद वायकर
ज्ञानसंपदा शाळेत दरवर्षी विविध विषयांच्या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलन साजरे केले जाते ,यावर्षीही गणित व भूगोल व भारतातील नद्यांचे पौराणिक,भौगोलिक दृष्ट्या कसे महत्त्व आहे या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाले. ज्ञानसंपदा शाळेतील स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांमधील विविध कला गुण सादर करण्याची संधी देणे. याच अनुषंगाने यावर्षी गणितातील बेरीज वजाबाकी व अंक यांची कलेशी सांगड घालून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. तसेच आपल्या भारताचे भौगोलिक स्थान व प्रमुख नद्या यांचे पावित्र्य व त्यातील वैविधता, संस्कृती, पौराणिक कथा संदर्भ याची जोपासना व्हावी म्हणून विविध नद्यांवर आधारित विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सरस्वती पूजन करून तसेच शाळेच्या वार्षिक अहवालाचे शैक्षणिक, विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा परीक्षा यातील मुलांची कामगिरी यासह वाचन करण्यात आले. हे वार्षिक संमेलन दिनांक२३ व २४ डिसेंबरला संपन्न झाले.
दि. २३ रोजी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गणित संकल्पनेवर आधारित विविध नृत्य, नाटिका, वेशभूषा सादर केल्या. तसेच दि. २४ डिसेंबरला इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध नद्या व त्यांची संस्कृती याविषयीचा संदेश आपल्या नृत्य कलाविष्कारातून तसेच बालनाटिकेतून पौराणिक कथा संदर्भांचा आधार घेऊन सामाजिक संदेश दिला. शैक्षणिक वर्ष २४-२५ मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण बजाज,उपाध्यक्ष श्री मिलिंद गंधे,मानद सचिव श्री अरुण कुलकर्णी,खजिनदार श्री अविनाश बोपर्डीकर तसेच विश्वस्त सौ सरिता प्रवीण बजाज, सौ. मिलन मिलिंद गंधे, श्रीमती आशा अशोक सोनवणे, श्रीमती लता अशोक भगत यांनी माऊली सभागृह येथे उपस्थिती दर्शवत या अभिनव उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शिक्षकांचे अभिनंदन केले.
. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. अशा या आव्हानात्मक व नाविन्यपूर्ण वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता गंगा आरतीने करण्यात आली. पालक प्रतिनिधी म्हणून जावेद शेख यांनी या आगळ्यावेगळ्या वार्षिक स्नेहसंमेलनाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्र कवडे, श्रावणी पांडेकर, सई पाठक, खुशी काळे मनीषा नकाते, भाविका सांगळे श्रेया करवंदे या विद्यार्थ्यांनी केले. गणित संकल्पनेचे कार्यक्रम प्रमुख म्हणून पूजा भाटिया तर भूगोल संकल्पनेचे कार्यक्रम प्रमुख म्हणून सोमा दास यांनी नियोजन केले. या सर्व कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर यांचे विशेष व मोलाचे मार्गदर्शन लाभले. ध्वनी व्यवस्था,तांत्रिक नियोजन,व अहवाल लेखन, श्री तुषार माळवी प्रसाद महाजन व नीलिमा निचित यांनी केले. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली, आभार प्रदर्शन श्री कैलास जाधव यांनी केले.
यावर्षीच्या वर्षीक स्नेहसंमेलनाचे पालकांकडून भरभरून कौतुक होत आहे .



