शिवसेना महाराष्ट्र राज्य उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वरदान
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी मशाल म्हणजे शुभांगी ताई

शिवसेना महाराष्ट्र राज्य उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वरदान
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी मशाल म्हणजे शुभांगी ताई
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- महाराष्ट्र राज्य टीचर्स/स्टुडंट्स असोसिएशन संस्थापक तथा राज्य अध्यक्ष उ.बा.ठा शिवसेना महाराष्ट्र राज्य उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांची स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्ह्यात खुप महत्वाकांक्षी ठरतं आहे. विद्यार्थ्यांना अनेक न्याय हक्कासाठी ते काम करत आहेत. महत्वाकांक्षी कामात ते विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी ते काम करत आहेत शिष्यवृत्ती योजना, नाव अपडेट अशे महत्वाचे मुद्द्यावर लक्ष देत आहेत शुभांगी ताई पाटील या आताच्या काळात शिक्षण क्षेत्रासाठी खुप मोठे योगदान ठरत आहे.त्यांनी वाघोदे ग्रामपंचायतीच्या निधीतील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या व्यायाम शाळेच्या प्रकल्पाबाबत त्रासदायक बाबी समोर आणल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवात झाली नाही.
शुभांगी ताई पाटील विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच माहितीचा अधिकार (ठढख) अर्ज दाखल करणार आहेत. गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी करणे आवश्यक आहे, पण त्यांच्या सुविधांचा अभाव असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगी ताई पाटील विद्यार्थांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.