हा विजय म्हणजे नव्या जबाबदारीचा शुभारंभ – रविंद्र चव्हाण ( भाजपा प्रदेशाध्यक्ष )
हा विजय म्हणजे नव्या जबाबदारीचा शुभारंभ - रविंद्र चव्हाण ( भाजपा प्रदेशाध्यक्ष ) ।

हा विजय म्हणजे नव्या जबाबदारीचा शुभारंभ !
भारतीय जनता पार्टीच्या सर्व विजयी उमेदवारांचे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन ! आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हा सर्वांच्या अपार कष्टामुळे भारतीय जनता पार्टीने हे ‘विजय पर्व’ साकारले आहे. भारतीय जनता पार्टीवर असलेल्या जनतेच्या अढळ विश्वासाचे प्रतिबिंब या ऐतिहासिक विजयामध्ये उमटले आहे.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे आपल्या भाजपा परिवाराचे सूत्र आहे. विकासपुरुष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात ‘विकसित भारत’ घडतो आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपला महाराष्ट्र देखील प्रगतिपथावर झपाट्याने वाटचाल करत आहे. पारदर्शी, विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी कार्यप्रणाली ही आपल्या भाजपा परिवाराची ओळख आहे. या ओळखीला जागून राष्ट्रहित, हिंदुत्व आणि लोकसेवा ही त्रिसूत्री तुम्ही सर्वजण नक्कीच आचरणात आणाल, असा विश्वास आहे. त्यासाठी भाजपा परिवारातील सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा !
यशाचे वाटेकरी अनेक असतात, पण अपयश मात्र पोरके असते असं म्हणतात… पण आपला भाजपा परिवार मात्र याला अपवाद आहे. आज ज्या उमेदवारांना काही कारणाने पराभवाला सामोरे जावे लागत आहे, पक्ष संघटना म्हणून भाजपा परिवार त्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनतेचा कौल मान्य करून आत्मपरीक्षण करूया आणि अपयशाचं कारण समजून घेऊया. पुन्हा एकदा नव्या जोमाने राष्ट्रसेवा आणि लोकसेवेचं व्रत पुढे नेऊया ! भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मी कायमच सर्व कार्यकर्त्यांसोबत असेन.
रविंद्र चव्हाण ( प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश )




