Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ; उबाठाने दिले निवेदन

सत्तेमधील महायुतीचे नेते गप्प का...?

0 7 6 9 4 9

शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ; उबाठाने दिले निवेदन

सत्तेमधील महायुतीचे नेते गप्प का…?

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आधीच वादळ,वारा,पावसामुळे मेटाकुटीस आलेला असून व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.त्यात भर म्हणून की काय महायुतीच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोलिसांचा मार सुद्धा खावा लागत आहे.अशी घटना नुकतीच जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली.ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.यात हलगर्जीपणा केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे,शिवसेना जळगांव तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांनी दिला आहे.यावेळी धरणगाव शिवसेना तालुकाप्रमुख जयदीपबापू पाटील,अरुणदादा पाटील,प्रेमराज राठोड व पदाधिकारी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे