Breaking
ब्रेकिंग

पावसामुळे पिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी..*

नुकसानीचा पंचनामा अहवाल शासनाला देऊन तात्काळ भरपाई रक्कम बॅंकेत जमा करण्याची मागणी...*

0 7 6 9 3 5

पावसामुळे पिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी..

नुकसानीचा पंचनामा अहवाल शासनाला देऊन तात्काळ भरपाई रक्कम बॅंकेत जमा करण्याची मागणी…

प्रतिनिधी : दादा आगळे

गेल्या काही दिवसांपासून वाळकी, गुंडेगाव,देऊळगाव सलग जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर अधिक वाढल्याने शेतातील उभे पीक पाण्यात गेल्याचे चित्र आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन,बाजरी,तूर, मका आणि भाजीपाला या पिकांवर पावसाचा जोरदार परिणाम झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
काही ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने शेतीचे पाणी बाहेर निघण्यास अडथळा निर्माण झाला आहे.पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. हवालदिल झालेले शेतकरी या पिकाकडे नुसते डोळे लावून पाहत आहे.यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकरी समाधानी होते.परंंतु
एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असे वाटले नव्हते अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाळकी, गुंडेगाव परिसरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक वाड्यावस्त्यांवर धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे धावडे वाडी,कुताळमळा हराळमळा कोतकर मळा आदी अनेक भागात सर्वत्र पाणी आले आहे.शेतकऱ्यांनी परिश्रमाने जोपासलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागील चार दिवसात तर त्याचा जोर आणखीनच वाढला आहे. या पावसामुळे या भागात नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश परिस्थिती आली आहे. नदी-ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे नगर ते गुंडेगाव या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे.मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले असून, त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुंडेगाव भागातील सर्वच शेतकऱ्यांची पिके पाण्यात आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाने पंचनामा सहकार्य सुरू करावे. नुकसानीचे पंचनामे झाल्यावर राज्य शासनाला अहवाल देण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना बँक खात्यांमध्ये थेट भरपाई पाठविण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या ४-५ दिवसांपासून सलग पाऊसाने उघडीप दिली होती परंतु.रविवार (ता.२१ ) पुन्हा पावसाने रात्री पासूनच सुरुवात केली.तसेच गेल्या दोन तीन दिवसांत सूर्यदर्शन ही झाले नाही.दिवसभर वाळकी,गुंडेगाव, देऊळगाव,धावडे वाडी, कुताळमळा हराळमळा भागात पावसाची थांबून थांबून रिपरिप सुरुच होती .

 

गुंडेगाव येथे मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह उडीद,कांदा,तुर इतर पिकांचं मोठं नुकसान झालेले असुन याबाबत अहिल्यानगर चे जिल्हाधिकारी यांना गुंडेगाव येथील नुकसान परिस्थिती बाबत माहिती दिली असता त्यांनी कृषी विभाग तसेच तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असुन ज्या ज्या ठिकाणी पुर परिस्थिती तसेच नुकसान झाले आहे तेथील पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.तसेच आपल्या भागातील पंचनामे होतील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

संतोष भापकर – उपसरपंच, गुंडेगाव.

. . . . .

पावसाचा जोर अधिक वाढल्याने शेतातील उभे पीक पाण्यात गेले आहे. सोयाबीन,उडीद कांदा, कपाशी, उडीद आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.नाल्यांना पूर आल्याने शेतीचे पाणी बाहेर निघत नाही.शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे.सरकारने लवकर मदत जाहीर करून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांचा सरकार वरचा विश्वास राहणार नाही.
राजेंद्र मोहन कोतकर – शेतकरी, गुंडेगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे