अखेर बोरी नदी पुलावरील अतिक्रमित हातगाड्या हटविण्यास यश

अखेर बोरी नदी पुलावरील अतिक्रमित हातगाड्या हटविण्यास यश
जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर शहरातील बोरी नदीच्या पुलावरील अतिक्रमित हातगाड्या अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवली आहेत. पुलावरील वाहतूक सुरळीत झाल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बोरी नदीच्या पुलावर राज्य मार्ग सहा व पंधरावर भाजीपाला, फळविक्रेते, मासे विक्रेते, कांदा लसूण विक्रेत्यांनी हातगाड्या, वाहने लावून बाजारपेठच उभारली होती. याबाबत पोलीस, नपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल कोणताही विभाग दखल घ्यायला तयार नव्हता त्यामुळे अतिक्रमण धारकांना फोफावले होते. आणि त्यांना नुकत्याच निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी देखील फुस
दिली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. ग्राहक सरळ पुलावर आपली वाहने थांबवुन बाजार करत होते. काही ग्राहक तर चारचाकी थांबवून खिडकीतून खरेदी करायचे. त्यामुळे मागच्या वाहनांना विलंब व्हायचा. सामान्य नागरिकांमध्ये व प्रवाश्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उमटली होती. अपघातात दोन तीन मृत्यू झाल्याने नाराजी वाढली होती. अखेरीस पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला बोरी पुलासह शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. ३० रोजी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राध्येश्याम अग्रवाल, अविनाश बि-हाडे, विकास सपकाळे, बुद्धभूषण चव्हाण, शांताराम संदानशिव यांनी पुलावरील १५ हातगाडी अतिक्रमण व दोन मासे विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. पहिल्यांदा सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले.



