भूमी सपोषण व संवर्धन राष्ट्रीय अभियानाची गुढीपाडव्याच्या शुभदिनी सुरूवात
शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करावी - - केंद्रिय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

भूमी सपोषण व संवर्धन राष्ट्रीय अभियानाची गुढीपाडव्याच्या शुभदिनी सुरूवात
शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करावी – – केंद्रिय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- या आजच्या कार्यक्रमात जर पाहिले तर जळगाव जिल्यातील नावाजलेले तीन मंत्री मा . गिरीश भाऊ महाजन मा . गुलाबराव पाटील आमदार अनिल भाईदास पाटील एकाच मंचावर एकत्र दिसले
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण करत असताना गोमाता भूमाता किती प्रमाणात महत्वाची बाब हे सांगीतले. झाड जगवल पाहिजे. नवीन तंञज्ञान आणावे. केळी साठी विशेष बाबी दिले पाहिजे.
गिरीष महाजन अक्षय कृषी परीवार व मंगल ग्रह
वतीने कार्यक्रम केंद्रिय कृषी मंत्री यांना मामा अशी उपमा देण्यात आली कारण त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली असून ती आता प्रयत्न मोठ्या प्रमाणात लाभ महिलांना मिळाला. जमिनीचा विचार करावा लागणार आहे व तपासणार आहे की आहे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भाजीपाल कसा आहे किती रसायनी खत आहे यामुळे तरुण पिढीला कमी वयात हार्ट अटॅक येत आहे. रसायनी खत कमीत कमी वापर केला पाहिजे ही काळाची गरज आहे.
क्रेंदिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संकट मोचन अशी उपमा गिरिष महाजन यांना दिली व
जानेवारी आणि फेब्रुवारी आमचे नाहीत, ते इंग्रजांचे आहेत.चैत्र शुद्ध आणि गुढीपाडवा हे आमचे नवीन वर्ष आहे.सर्व काळ प्रभू रामाला समर्पित आहेत. आपण सर्व एक कुटुंब आहोत.भारताने विचार करायला हवा. आपण नद्यांचे पाणी प्यायलो. आपण झाडांची पूजाही केली. कृषी मंत्री शेतकरी कुटुंबातील आहेत. वेळ मिळेल तेव्हा ते आजही शेती करतात.आई, तू आम्हाला संपत्ती आणि फळे देतेस. आम्हाला पाणी वाचवायचे आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अक्षय कृषी परिवार व मंगळ्लाह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले, केंद्रीय पीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी मातीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. गुलाबराव पाटील यांनीही मातीला ‘माता’ मानणाऱ्या भारतात तिचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.



