Breaking
ब्रेकिंग

रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावावी:- रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

0 7 6 9 4 4

रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावावी:- रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०६/ रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांची दहिवडी येथे जाऊन भेट घेतली व रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावावी असे निवेदन देवुन या संदर्भात चर्चा करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यास कुकडी प्रकल्पातून 6.23 टी.एम.सी पाणी मिळणे अपेक्षित असताना एक टी. एम.सी सुद्धा पाणी मिळत नाही त्यामुळे सदर लाभार्थी व 45 गावातील सरपंच, शेतकरी हे सदर पाणी नदीद्वारे उजनी धरणात सोडून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेद्वारे उपलब्ध करून देणे बाबत मागणी करीत आहेत. यासाठी विविध आंदोलने निवेदने व विनंती पत्र देऊन वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबाबत जलसंपदा विभागाने सविस्तर अभ्यास करून शासनास अहवाल सादर केलेला आहे या योजनेच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. तरी आपण जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी व रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समिती करमाळा यांची संयुक्त बैठक आयोजित करून ही योजना मार्गी लावावी अशी मागणी करण्यात आली.

याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन मंत्री महोदयांनी यासाठी सोलापूर येथे वेळ देऊन सविस्तर माहिती घेण्यासाठी चर्चा करण्याचे मान्य केले, तसेच या योजनेची सविस्तर माहिती घेऊन आपण संयुक्त बैठक आयोजित करून ही योजना मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी पोथरे सरपंच अंकुश शिंदे, पिंपळवाडी चे मदन पाटील, कोर्टी मा. उपसरपंच सुभाष अभंग, शिवाजी माने, बाळासाहेब टकले, अमर काळे, सिद्धार्थ वाघमारे, नरेंद्रसिंह ठाकूर, भारत शेंडे आदी जण उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे