मोबाईलच्या आहारी गेल्याने उद्याची तरुण पिढीचे भविष्य धोक्यात

मोबाईलच्या आहारी गेल्याने उद्याची तरुण
पिढीचे भविष्य धोक्यात
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- आजची तरुण पिढी मोबाईलाच्या आहारी गेल्याने उद्याच्या भविष्याची चिंता पालकांना सतत लागलेली दिसत आहे. लहान तीन ते चार वर्षाची मुले मोबाईल न दिल्याने जेवण करत नाही. लहान मुलांनाच्या डोळ्यांना मोबाईल किती हाणिकारक आहे.तरी देखील पालक मुलांना सहज मोबाईल देतात. मोबाईल हा न दिल्याने मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या दिसत आहे.तसेच मोबाईल न घेऊन दिल्यामुळे पैसे चोरुन EMI वर मोबाईल विकत घेतलेल्या घटना आढळल्या आहेत.
आजच युग मोबाईल असेल तरी तो किती प्रमाणात पाहावा कींवा वापर करावा हे आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिने ठरवावे.कारण मुलेच नाही मोठे व्यक्ती , महिला व आजी आजोबा सुद्धा घरात मोबाईल पाहतात व मुले अनुकरण करतात.जर यावर आपण लवकर काळजी घेतली तर पुढच्या काळात नवीन डाॅक्टर येतील मोबाईल डाॅक्टर.पेन्शट इतके असतील की डाॅक्टराची संख्या कमी पडेल.मोबाईल हा शिवाय जीवन अपुर्ण असल्यासारखे वाटते. मोबाईल मुळे परस्परातील संवाद कमी झालेल्या दिसत आहे. मोबाईल मुळे पती पत्नीचे भांडण , वडीलांचे मुलांचे भांडण होताना दिसत यांचे प्रमाण वाढत चालेले आहे.
या मोबाईल मुळे अनेक मुलामुलीचे करीअर
खराब झालेले आहे.आधी घरात टि.व्ही. होता तो सर्वजण एकत्र बसून तरी बघायचे पण आता तर घरात जेवढे व्यक्ती तेवढे मोबाईल असतात.
पत्येक जण त्यामध्ये वेळ देतात.एकमेकांशी बोलत नाही.जेवण करताना सुद्धा मोबाईल , गाडी चालवत असताना मोबाईल कानाल लावून बोलताना अनेक अपघात झाले.यात तरुण मुलांचे हात पाय निकामी झाले.



