आईच्या निधनानंतर प्रथेप्रमाणे दहावा किंवा तेरावे असे कोणतेही पारंपारिक विधी होणार नाही :- मा. तुकाराम मुंढे (IAS)

आईच्या निधनानंतर प्रथेप्रमाणे दहावा किंवा तेरावे असे कोणतेही पारंपारिक विधी होणार नाही :- मा. तुकाराम मुंढे (IAS)
*जे का रंजले गांजल त्यासी म्हणे जो आपुले* *तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा*
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
मुंबई: राज्याचे अतिशय शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर सनदी अधिकारी (IAS) मा. तुकाराम मुंढे, सचिव (मंत्रालय, मुंबई) यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला आहे. आपल्या आई स्व. आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व कर्मकांड आणि कालबाह्य रूढी-परंपरांना छेद देत, आईच्या अस्थी (रक्षा) कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जित न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी या अस्थींवर दारात एक मोठा वटवृक्ष लावून खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धनाचा मोठा संत उक्तींचा प्रत्यक्ष अनुभव मानव सेवा हीच ईश्वरसेवा’, ‘तिर्थी धोंडा पाणी, देव रोखला सज्जनी’ आणि ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले.. तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा…’ या संतांच्या शिकवणी केवळ प्रवचनापुरत्या मर्यादित न ठेवता, तुकाराम मुंढे यांनी त्या प्रत्यक्ष आचरणात आणल्या आहेत.
त्यांनी कर्मकांडावर घाव घालत शुद्ध आचरण आणि निसर्ग संवर्धनावर जोर दिला आहे. त्यांच्या या कृतीतून अनेकांना अंधश्रद्धा आणि निरर्थक रूढी-परंपरांना बाजूला सारण्याची प्रेरणा मिळेल.परंपरांना फाटा, कर्तव्याला अग्रक्रम !दुःखद प्रसंग असूनही मुंढे साहेबांनी आपल्या कर्तव्यदक्षतेला तसूभरही धक्का लागू दिलेला नाही. आईच्या निधनानंतर प्रथेप्रमाणे होणारे दहावा, तेरावा किंवा गोडजेवण असे कोणतेही पारंपारिक विधी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर, “केवळ दोन दिवस सांत्वनपर भेटीसाठी आम्ही कुटुंबीय उपलब्ध राहू,” असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. यातून त्यांची वेळेची शिस्त आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, ज्याचे समाजाकडून विशेष कौतुक होत आहे.



