शारदा करंडक ट्रॉफीवर न्यू लॉ कॉलेज ने कोरले नाव
संपदा लांडगे आणि हुमैरा अंसारी यांची यशस्वी भरारी
शारदा करंडक ट्रॉफीवर न्यू लॉ कॉलेज ने कोरले नाव
संपदा लांडगे आणि हुमैरा अंसारी यांची यशस्वी भरारी
प्रतिनिधी :आसावरी वायकर
हिंद सेवा मंडळाचे,पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर आयोजित शारदा करंडक वाद स्पर्धा
व ज्ञानेश्वर करंडक स्पर्धा बुधवार दि .१७ सप्टेंबर रोजी पेमराज सारडा महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली .
या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज,न्यू लॉ कॉलेज अहिल्यानगर च्या
विद्यार्थीनी संपदा मच्छिंद्र लांडगे आणि हुमैरा अंसारी यांनी सांघिक वाद विवाद प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत त्यासह शारदा करंडक आणि रोख पारितोषिक रुपये ५१०० सांघिक बक्षीस व वैयक्तिक उत्कृष्ठ वक्त्याचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस लांडगे संपदा हिला मिळाले . रोख पारितोषिक रुपये १५०० वैयक्तिक बक्षीस मिळाले .
संपदा व हुमैरा यांना न्यू लॉ विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एम.तांबे सर व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले .
यावेळी पेमराज सारडा विद्यालयाचे सर्व पदाधिकारी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .



