शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – प्रांत अधिकारी सुधीर पाटील

शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – प्रांत अधिकारी सुधीर पाटील
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : दि.05 / शासनाच्या सर्वच योजना समाजहिताच्या असतात. त्या लोकाभिमुख करण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व पदाधिकार्यांनी संयुक्तपणे केले पाहिजे त्यासाठी जास्तीचा लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील चास मंडळातंर्गत अकरा गावातील सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, सेतूचालक, सामाजिक कार्यकर्ते, ग्राम महसूल अधिकारी, रेशन दुकानदार यांची संयुक्त कार्यशाळा प्रांत अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चास येथे दिनांक 03/03/2026 रोजी आयोजित केली होती. प्रारंभी मंडळाधिकारी वैशाली हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे यांनी प्रास्ताविक भाषणात अभियानाचा हेतू स्पष्ट केला.
09 एप्रिल 2026 रोजी होणार्या महाराजस्व अभियानात 7/12 उताऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारस नोंदी करून तो उतारा जिवंत करणे, उताऱ्यावरून अनावश्यक नावे व कालबाह्य बोजा कमी करणे, जुने बंडीग, तगाई बोजा कमी करणे, नजर गहाण बोजा कमी करणे, पोट खराबा वहीती केला असल्यास लागवड क्षेत्रात रुपांतरित करणे. तुकडेजोड/तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेले व्यवहारामुळे रद्द झालेले फेरफार पुन्हा घेणे अथवा ईतर अधिकारातील नाव कब्जेदार सदरी घेणेबाबतची कार्यवाही करणे. 7/12 वरील चुका दुरुस्त करणे. शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न, जाती, डोमासाइल, नॉनक्रीमिलेअर इत्यादी दाखल्यांचे वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मिळून देणे, ॲग्रीस्टॅक योजनेबाबत माहिती देणे व नोंदणी करून घेणे, मातोश्री बळीराजा शेतपाणंद रस्ते मजबुतीकरण करणे, नवीन अकृषक धोरण बाबत जनजागृती कारणे. इत्यादी बाबींचा समाज घटकांना लाभ देण्याचे नियोजन आहे.
यावेळी चास मंडळांतर्गत सरपंच युवराज कार्ले, विठ्ठल दळवी, भास्कर भोर, प्रतिक शेळके, संदीप ढवळे, बाबा टकले, रवींद्र कडूस, संतोष खोबरे, तुकाराम कातोरे, रमेश रासकर यांचेसह ग्राम महसूल अधिकारी अविनाश देसुरकर, संतोष मांडगे, जीवन हारदे, सुनील ताकते, प्रियांका भोगे. सेतू चालक प्रशांत साठे, अजय काळे, रेखा जाधव, सुवर्णा सरोदे.मुख्याध्यापक भारत कांबळे .इ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष मांडगे यांनी केले. आभार रमेश रासकर यांनी मानले.



