Breaking
ब्रेकिंग

अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी – भाजपा युवा मोर्चा 

0 8 6 5 5 4

अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी – भाजपा युवा मोर्चा 

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर – शहरातील इस्लामपुरा भागात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फलकाविरोधात भाजप युवा मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त करत तो तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल मगन चौधरी यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इस्लामपुरा परिसरात लावण्यात आलेला फलक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणताही फलक किंवा नामफलक लावताना संबंधित प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र सदर फलक नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच, अशा प्रकारच्या वादग्रस्त फलकांमुळे शहरातील काही समाजघटकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अमळनेर शहरात सर्व समाजामध्ये शांतता, सलोखा आणि परस्पर आदर कायम राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

इस्लामपुरा भागात लावण्यात आलेला टिपू सुलतान यांचा फलक तात्काळ काढण्यात यावा तसेच भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त फलक परवानगीशिवाय लावले जाणार नाहीत यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे .

यावेळी दीपक भोई,दीपक पवार,समाधान पाटील,शिवकिरण बोरसे,कल्पेश पाटील,सौरभ पाटील,बजरंग दलाचे नितेश कामदार ,सुमित राजपूत,नलेश पाटील, मनोज महाजन,अमोल महाजन,हितेश माळी,अनिरुद्ध शिसोदे,शुभम पवार,परेश जोशी, कुणाल शाह,गौरव विसपुते, प्रसाद भामरे, सागर शेटे, हर्षल शिंपी, राजेश खरारे,दुर्गेश सोनवणे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे