Breaking
ब्रेकिंग

तलाठ्यांचे बेमुदत राज्यस्तरीय आंदोलन सुरू

0 7 6 9 4 3

तलाठ्यांचे बेमुदत राज्यस्तरीय आंदोलन सुरू

वाळकी / प्रतिनिधी : दादा आगळे

नवा लॅपटॉप आणि प्रिंटर मिळण्यासाठी वारंवार विनंती करूनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यातील १५ हजार तलाठ्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सोमवार (ता. १५) पासून हे सर्व तलाठी ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकणार असून, ई-पीकपाहणी, डिजिटल सातबारा, ई-फेरफारसह सर्व संगणकीय प्रक्रिया रखडणार आहेत.

गावपातळीवरील महसुली कामकाजाची प्रमुख जबाबदारी असलेल्या तलाठ्यांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. सातबारा नोंदणी, फेरफार, डिजिटल सातबारा, ई-पीक पाहणी, नुकसानीचे पंचनामे, विविध योजनांची अंमलबजावणी अशा अनेक आघाड्यांवर तलाठी एकाचवेळी काम करतात. मात्र, त्यांच्या हातातील साधने जीर्णावस्थेत आहेत. आठ ते दहा वर्षांपूर्वीचे लॅपटॉप, वारंवार सर्व्हर न मिळणे, प्रिंटरअभावी प्रतींचे वितरण न होणे अशा अडचणींमुळे कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. तलाठी संघाच्या निवेदनात नवीन लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध होईपर्यंत ऑनलाइन कामबंदीचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आला आहे. परिणामी गावापासून शहरापर्यंतचे महसुली कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे