Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथील वाडी वस्तीवर रोहीत्र व विद्युत पोल कामाचे उद्घाटन…

प्रत्येक्षात कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान..

0 7 6 9 4 3

गुंडेगाव येथील वाडी वस्तीवर रोहीत्र व विद्युत पोल कामाचे उद्घाटन…

प्रत्येक्षात कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान..

वाळकी /   प्रतिनिधी :  दादासाहेब आगळे

गुंडेगाव येथील वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भारनियमन तसेच विद्युत दाबाच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार उर्जा विभागाकडे भाजपा तालुका अध्यक्ष दादासाहेब दरेकर, मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अभिलाष घिगे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुरावा व प्रयत्नातून गुंडेगाव येथील जुनी चौधरवाडी,भिसे वस्ती येथे सिंगल फेज रोहित्र तसेच दावलमालीक मानमोडी परिसरात विद्युत पोल उभारणीच्या कामांचा आज शुभारंभ नुकताच करण्यात आला असून प्रत्येक्षात कामाला सुरुवात करण्यात आली.सदर ट्रांसफार्मरमुळे व विद्यूत पोलमुळे गुंडेगावातील आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी तसेच नागरिकांच्या विजेबाबतच्या अनेक समस्या दूर होणार आहे.

शेतकरी,घरगुती ग्राहकांना २४ तास व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच विविध योजनेच्या माध्यमातून विजपुरवठ्याबाबत प्रोत्साहन देत आहे.जुनी चौधरवाडी,भिसे वस्ती व दावलमालीक परिसरात मागील अनेक दिवसांपासून सिंगल फेज विद्युत पुरवठा होत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर अभिलाष घिगे व दादासाहेब दरेकर यांनी उर्जा विभाग व विद्युत महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक मंजुरी मिळवून दिली.त्यानुसार सिंगल फेज रोहित्र व नवीन विद्युत पोल उभारणीचे काम सुरू करण्यात झाले आहे.या कामांमुळे वाडी वस्ती वरील अनेक घरांना वीजपुरवठा होणार असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठीही मोठा दिलासा मिळणार आहे.
गुंडेगावातील विकासकामे प्रत्येक्षात मार्गी लागल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.भविष्यातही परिसरातील मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार अभिलाष घिगे व दादासाहेब दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

या कामांच्या शुभारंभप्रसंगी मार्गदर्शक बबनराव हराळ पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी संरपच मंगलताई सकट, बाळासाहेब सकट,माजी उपसरपंच संतोष भापकर, रंगनाथ भापकर, बाळासाहेब माने, सतिश चौधरी, संतोष धावडे, राहुल चौधरी, संतोष कोतकर, गोरख माने, प्रशांत माने साहेब,संभाजी जाधव, संदिप धावडे, संतोष कासार, सागर कासार, रविंद्र कासार, महेश कासार,बाळासाहेब चौधरी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन उर्जा विभाग व महावितरणच्या माध्यमातून आज कार्यान्वित झालेल्या रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे,त्यामुळे गुंडेगाव वाडी वस्ती भागातील विजेच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.अतिरिक्त लोड मुळे खराब होणारी रोहित्रांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. शेतकरी व नागरिक विजेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता भविष्यात घेतली जाईल.

दादासाहेब दरेकर – अध्यक्ष भाजपा युवा नेते

…..

गुंडेगावात रोहीत्र व विद्युत पोल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गावांमध्ये विजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरावे लागते. शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून त्यादृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे.शासनाकडून वीज निर्मिती करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहे.आगामी काळात मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होणार असुन भाजपा सरकारच्या काळात विविध प्रश्न मार्गी लावण्याचे महत्वाचे काम केले जात आहे.

अभिलाष घिगे पाटील – मा.सभापती कृ.उ.बा.स.अहिल्यानगर

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे