डॉ. उद्धव शिंदे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : डॉ. सालीमठ
सामाजिक कार्यासाठी डॉ. शिंदे यांचा राज्य साखर आयुक्तांकडून सन्मान
डॉ. उद्धव शिंदे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : डॉ. सालीमठ
सामाजिक कार्यासाठी डॉ. शिंदे यांचा राज्य साखर आयुक्तांकडून सन्मान
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – सामाजिक जाण ठेवून सातत्याने कार्य करणारे डॉ. शिंदे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. अशा कार्यकर्त्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे गौरवोद्गार राज्य साखर आयुक्त डॉ. सिद्धाराम सालीमठ यांनी काढले.
स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल राज्य साखर आयुक्त डॉ. सिद्धाराम सालीमठ यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. उद्धव शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे कार्य तसेच बेघर आणि अनाथ नागरिकांसाठी विविध ऋतूंनुसार मदत उपक्रम राबवले आहेत. थंडीत ब्लॅंकेट, उन्हाळ्यात टोपी आणि पावसाळ्यात छत्री वाटप करून समाजातील दुर्बल घटकांसाठी सतत सेवा कार्य केले आहे. याची दखल घेऊन डॉ. सालीमठ यांनी उद्धव शिंदे यांचा गौरव केला .



