श्रीरामपूर शहरातील एका मल्टिस्टेटकडून ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक !
ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत याकरीता श्रीरामपूर पोलिसांना ठेवीदारांचे निवेदन
श्रीरामपूर शहरातील एका मल्टिस्टेटकडून ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक !
ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत याकरीता
श्रीरामपूर पोलिसांना ठेवीदारांचे निवेदन
राहुरी तालुका जावेद शेख
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील आजी/ माजी सैनिकांची व सामान्य नागरिकांची शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या एका मल्टिस्टेट को ऑफ (पतसंस्था) माध्यमातून ठेवीदारांची व सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ऐन सनासुदाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याने सर्व ठेवीदार हतबल झाले आहेत.
त्यातच सुरळीतपणे चालू असलेल्या या मल्टिस्टेट ची शाखा गेल्या महिनाभरापासून अचानक बंद झाली असल्याने ठेवीदारांमध्ये आणखी शंका निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने संबंधित ठेवीदारांनी संबंधित मल्टिस्टेट च्या संचालकांशी
अनेक वेळा संपर्क केला परंतु त्यांच्याकरवी सातत्याने उडवा – उडवीची उत्तरे आणी खोटी आश्वासने मिळत असल्याने आजी- माजी सैनिक व सामान्य नागरिक यांच्या अतिशय कष्टाच्या असलेल्या कमाईवर या मल्टिस्टेट ने डल्ला मारला आहे का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
यासाठी शासन व प्रशासनाने सदरील मल्टिस्टेट च्या संचालकांवर लवकरात लवकर एम.पी.आय. डी. अंतर्गत गुन्हे दाखल करून आजी – माजी सैनिक व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत अशी त्रस्त ठेवीदारांकडून मागणी केली जात आहे.
यामध्ये कायम ठेव व प्राप्त ६९ ठेवीदारांच्या यादी प्रमाणे ४०५३९९०० /- रुपये व दैनंदिन जमा १५७५८३५ /- रूपये इतकी एकुण रक्कम आहे, ठेवीदारांनी ठेवलेली पूर्णतः रक्कम त्यांना व्याजासकट परत देऊन उचित न्याय मिळावा यासाठी आजी -:माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे पदाधिकारी मेजर कृष्णा सरदार, अशोक कायगुडे, संग्राम यादव, सतिश सांडभोर तसेच ठेवीदार इंद्रपालसिंग सेठी , मनजीतसिंग शेठी ,रितेश माटा, तौसिफ सय्यद, अशोक वैद्य, विजय शिवरकर, सिद्धार्थ कदम , सारिका बोल्ले, हसीना शहा, मसरत बागवान , चंद्रकला मेहेत्रे ,राहुल पडवळकर, सुकन्या पडवळकर ,रमेश कुऱ्हे, सुमित कुऱ्हे, प्रसाद कुमावत इत्यादी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



