Breaking
ब्रेकिंग

जैन धर्मींयाचे तिर्थक्षेत्र “सम्मेद शिखर” स्वच्छता अभियानाचे आयोजन

अहिल्यानगर येथे स्वयंसेवकांचा सत्कार व अल्पोपहार वाटप ; १००८ स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

0 7 6 9 4 9

जैन धर्मींयाचे तिर्थक्षेत्र “सम्मेद शिखर” स्वच्छता अभियानाचे आयोजन

अहिल्यानगर येथे स्वयंसेवकांचा सत्कार व अल्पोपहार वाटप ; १००८ स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रतिनिधी : संवेद वायकर

जैन धर्मींयाचे तिर्थक्षेत्र “सम्मेद शिखर” झारखंड येथे सन्मती सेवा दल अकलुज यांनी तिर्थवंदन व सम्मेद शिखर स्वच्छता अभियान वर्ष १४ वे दि. १४ / ०९ / २५ ते २१ / ०९ / २५ या कालावधीत आयोजीत केले आहे. संपुर्ण भारतातुन १००८ स्वयंसेवक येणार असुन महाराष्ट्रातील २५० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. सदर अभियानाची नोंद गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये होणार आहे. सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष श्री. मिहीरभाई गांधी या अभियानाचे नेतृत्व करीत आहेत. आज १२/०९/२५ रोजी सोलापुर, सांगली, पुणे , नगर जिल्ह्यातील २५० भाविक रेल्वेने रवाना झाले आहेत. आज सकाळी ०९०० वाजता अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर अहील्यानगर जैन समाजाचे वतीने,श्री.गांधी व स्वयंसेवकांचा सत्कार तसेच अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली. सदर कार्यक्रमास सर्वश्री. संजय महाजन, प्रकाश भाळवणकर, संतोष भोसे, शिरीष बेगडे, संतोष कटारीया, संदीप रपारीया, प्यारेलालजी, सौ. निता भाळवणकर सौ. वंदना बेगडे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे