डांबरी रस्त्याची साईड पट्टी कोरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू:- आबा भोसले यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन

डांबरी रस्त्याची साईड पट्टी कोरून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू:- आबा भोसले यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ करमाळा तालुक्यातील अंकुश शिंदे व शरद अंकुश शिंदे यांनी निमगाव (ह)ते गौंडरे कडे जाणारा मुख्य डांबरी रस्ता कोरून साईट पट्टी नष्ट केली आहे, तसेच निमगाव हवेली ते गौंडरे कडे जाणारा जुना कौडगाव/जगदाळे पठार वस्ती कडे जाणारा रस्ता कोरून साईट पट्टी नष्ट केली आहे. ते अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात यावे अन्यथा आम्ही गावातील सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन उपोषण करू असा इशारा आबा प्रभू भोसले यांनी तहसीलदार करमाळा यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे. श्री भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, श्री अंकुश शिंदे वैगरे लोक यांनी निमगाव हवेली ते गौंडरे कडे जाणारा मुख्य डांबरी रस्ता कोरून साईट पट्टी नष्ट करून ते क्षेत्र वहिवाट करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून डबल वाहन चालवणे अत्यंत जोखमीचे झाले आहे. तसेच काम जुना कौडगाव जगदाळे पठार वस्ती कडे जाणारा रस्ता कोरून साईट पट्टी नष्ट करून वहिवाट करत आहेत. त्यामुळे गावातील लोकांना विनाकारण त्रास होत आहे.
शासकीय रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे ते तात्काळ काढून घेण्याचे आदेश सबंधित शेतकऱ्यास द्यावेत व आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही गावातील सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तहसील कार्यालय समोर उपोषणास बसणार आहोत असे म्हटले आहे.
या निवेदनावर कैलास गाडे, दिनकर भोसले, हनुमंत शिंगण, हनुमंत जगदाळे, रेवण पारेकर, हनुमंत जगताप, धोंडीराम रोकडे, सुभाष रोकडे, नवनाथ रोकडे, गोकुळ नीळ, पंडित नीळ, तानाजी जगदाळे, अनिल साळवे, आदी शेतकऱ्यांच्या सह्या केल्या आहेत.



