Breaking
ब्रेकिंग

डाळिंब पिकावर मावा किड: राहुरी कृषी विद्यापीठामार्फत हॉर्टसॅप सल्ला

0 7 6 9 4 7

डाळिंब पिकावर मावा किड: राहुरी कृषी विद्यापीठामार्फत हॉर्टसॅप सल्ला

एस डब्ल्यू न्यूज रिपोर्ट

डाळिंब पिकावरील मावा (Aphis punicae) ही एक अत्यंत महत्त्वाची व उत्पादनावर थेट परिणाम करणारी कीड असून, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत, विशेषतः छाटणीनंतर तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सध्या आंबे बहराच्या नियोजनासाठी अनेक ठिकाणी छाटणी करण्यात आलेली असून, त्यानंतर फुटलेल्या कोवळ्या पालवीवर मावा किडीचा तीव्र प्रादुर्भाव आढळून येत आहे.

मावा ही कीड कोवळी पाने, कळ्या, फुले व कोवळी फळे यांवर रसशोषण करते. परिणामी झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, फांद्या कोमेजतात तसेच फळांची अकाली गळ होते. यामुळे डाळिंब उत्पादनात लक्षणीय घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्या अनुषंगाने राहुरी कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. संजय कोळसे व डॉ. प्रवीण खैरे (हॉर्टसॅप प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग) व किटकशास्त्रज्ञ डॉ. सखाराम आघाव (किटकशास्त्र विभाग) यांच्याकडून शेतकऱ्यांना हॉर्टसॅप सल्ला देण्यात येत आहे.

किडीची शास्त्रीय ओळख
डाळिंबावरील मावा किडीचे शास्त्रीय नाव Aphis punicae असून ही कीड आकाराने अतिशय सूक्ष्म (१.०–१.७ मि.मी.) असते. पंखा विरहित व पंखधारी असे दोन्ही प्रकार आढळतात. पंखा विरहित मावा पिवळसर-हिरवी ते करड्या-हिरव्या रंगाची असते. शरीराच्या मागील बाजूस असलेल्या सिफन्क्युली (नळीप्रमाणे रचना) फिकट हिरव्या ते तपकिरी रंगाच्या असून टोकाकडे गडद दिसतात.
या किडीची सोंड तिसऱ्या जोडपायांच्या मुळापर्यंत पोहोचत नाही, हे तिचे महत्त्वाचे ओळखण्याचे लक्षण आहे.

नुकसानीचे स्वरूप
रसशोषणामुळे पाने पिवळी पडतात, फांद्या कोमेजतात व उत्पादन घटते. याशिवाय मावा किडीमधून स्रवणाऱ्या हनीड्यू वर काळी बुरशी (सूटी मोल्ड) वाढते, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण कमी होऊन झाडांची एकूण वाढ खुंटते. परिणामी फळांचा दर्जा व उत्पादन दोन्ही बाधित होते.

व्यवस्थापन उपाय
* किडग्रस्त पाने व फांद्या गोळा करून नष्ट कराव्यात
* योग्य छाटणी करून बागेत हवा खेळती ठेवावी
* एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत
* किडीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास सायॲन्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओ.डी ०.९ मि.ली. प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. (कीटकनाशक लेबल क्लेम आहे).

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे