Breaking
ब्रेकिंग

जळगाव जिल्ह्याचा गौरव : पंतप्रधानांकडून उज्ज्वल निकम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

0 7 6 9 4 3

जळगाव जिल्ह्याचा गौरव : पंतप्रधानांकडून उज्ज्वल निकम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी तसेच राज्यसभेचे राष्ट्रपती निर्देशित खासदार अ‍ॅड. उज्ज्वल देवराव निकम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष शुभेच्छापत्र पाठवून गौरव केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
पंतप्रधानांनी पाठवलेल्या पत्रामध्ये निकम यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचे कौतुक केले आहे. देशाच्या विकासाच्या प्रवासात त्यांच्या योगदानामुळे राष्ट्र अधिक उंची गाठेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे आपल्या कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या भावनेमुळे ओळखले जातात. त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपती निर्देशित सदस्य म्हणून झालेली नियुक्ती ही देखील जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
तसेच, प्रभाग क्रमांक ९ समस्या ग्रुपचे सर्व ॲडमिन पंकज नाले सर, प्रा. डॉ. संदीप पाटील, माधुरी पाटील तसेच उर्वरित ७७२ सदस्यांनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मिळणे ही केवळ निकम यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी सन्मानाची बाब असून, विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे