ओम महिला मंडळाचे हे दानशूर कार्य कौतुकास्पद:- तहसिलदार शिल्पा ठोकडे
ओम महिला मंडळाचे हे दानशूर कार्य कौतुकास्पद:- तहसिलदार शिल्पा ठोकडे
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०४/ करमाळ्यातील ओम महिला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मंडळाने पुरग्रस्तांना किराणा किट, धान्य, शालेय साहित्य, साड्या, कपडे, बिस्किटे, चादरी, सॅनिटरी नैपकिन इं, उपयोगी साहित्य देवून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
याप्रसंगी मा. तहसीलदार शिल्पा ठोकडे मॕडम यांनी महिला मंडळाचे कौतुक करुन अशी दानशूर मंडळी करमाळा शहरास लाभल्याचेही कौतुक केले. पुढे त्या म्हणाल्या की महिला कशातच कमी नाहीत हे आज या मंडळाने दाखवून दिले.
मंडळाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या अंजली राठोड श्रीवास्तव यांनी ही प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास ज्योती पांढरे, डॉ. अपर्णा भोसले, पुष्पा लुंकड, मितवा अग्रवाल, अलका यादव, सुनिता यादव, रत्नमाला मुथा, अस्मिता पांढरे, डॉ. प्रिती शेटे, उषा बलदोटा, सुलभा खुळे, राधिका वाशिंबेकर, सविता शहा, शहनाज मोमीन, तसेच पत्रकार बंधू जयंत दळवी, शितलकुमार मोटे, अश्पाक सय्यद, विशाल परदेशी, अलिम शेख, सचिन नलावडे, सुनिल भोसले, हर्षवर्धन गाडे इं. मान्यवर उपस्थित होते.



