Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस ठाण्याकडून वर्धमान ज्वेलर्स च्या चोरीतील पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने फिर्यादीस परत

0 7 6 9 4 3

राहुरी पोलीस ठाण्याकडून वर्धमान ज्वेलर्स च्या चोरीतील पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने फिर्यादीस परत

राहुरी तालुका जावेद शेख

दि.13/07/2025 रोजी सायंकाळी 05.00 वा. ते दि. 14/07/2025 रोजी सकाळी 06.00 वा. सुमारास दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी फिर्यादीचे राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स नावाचे दुकानाचे शर्टरचे सेंटर लॉक हत्याराच्या सहाय्याने तोडुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील 60,45,000 /- रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने, डी.व्ही.आर. स्वत:चे आर्थीक फायदयासाठी चोरुन घेवुन गेले बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे दि.14/07/2025 रोजी गु.र.नंबर I 783/2025 भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 305 (a), 331 (4) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
पो.नि.संजय आर.ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी गुन्हयाचा तपास करण्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पो.कॉ राजु जाधव, पोहेकॉ सुरज गायकवाड, पोहेकॉ राहुरी यादव, पोकॉ प्रमोद ढाकणे, पोकॉ अंकुश भोसले, पोकॉ सतिष कुऱ्हाडे, पोकॉ सचिन ताजणे, पो.कॉ. गणेश लिपणे यांना तपासाबाबत सुचना दिलेल्या प्रमाणे नमुद पथकाने गुन्हयाचा तांत्रीक दृष्टया तपास करुन सदरचा गुन्हा हा आरोपी 1)विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी, रा.साईबाबा मंदिरा शेजारी रामटेकडी, हडफसर पुणे ,2) अतुल सुरेश खंडागळे रा.प्रथमा बिल्डींग डी. प्लँट नंबर 217 राम टेकडी हडफसर पुणे, 3) सिंगरुसिंग टाक रा.मुंबई , 4) टिलुसिंग टाक रा.मुंबई , 5)विजय उर्फ टिडडा जुन्नी,6) सोनुसिंग जुन्नी यांनी केलेला असल्याचे निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणला. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
आरोपी विकीसिंग जालींदर सिंग कल्याणी व अतुल सुरेश खंडागळे यांचा अत्यंत शिताफीने शोध घेतला असता ते मिळुन आल्याने आरोपींना सदर गुन्हयात अटक करुन आरोपींकडुन गुन्हयातील चोरीस गेल्या माला पैकी एकुण 4,95,269 /- रुपये किंमतीचे त्यात (1) 1,67,365 /- रुपये किंमतीचे 18.250 मिली ग्रॅम त्यात 0.350 मिली ग्रॅम वजनाचे काळे मनी असलेली डिझाईनची 22 कॅरेट सोन्याचे मिनी गंठण पोत (2)3,27,904 /- रुपये किंमतीचेे एक 35.070 मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड तुकडा , अंदाजे 22 कॅरेट चा सोन्याचे दागीने जप्त करण्यात आलेले होते.
आज रोजी नमुद 4,95,269 /- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. न्यायालय राहुरी , ता.राहुरी जि.अहिल्यानगर यांचे आदेशान्वये फिर्यादी सौरभ राजेंद्र भन्साळी रा.अनिल तनपुरे कॉलणी रोड, राहुरी ता.राहुरी जि.अहिल्यानगर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर , मा.श्री.सोमनाथ वाकचौरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर जि.अहिल्यानगर , मा.श्री.जयदत्त भवार , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपुर विभाग जि.अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे