श्री भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न
स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
श्री भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न
स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी : संवेद वायकर
सोलापूर : दि . १७ / श्रध्देय श्रीमान भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी महोत्सव २०२५ निमित्ताने सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि वालचंद शिक्षण समूह, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कारातून सेवा.. सेवेतून शिक्षण.. या संकल्पनेतून सोमवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वा. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अशोक चौक येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (IAS) यांच्या शुभस्ते करण्यात आले .
सदर कार्यक्रम प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. वीणा पवार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या . डॉ. रणजित गांधी अध्यक्ष, श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान तथा मानद सचिव, वालचंद शिक्षण समूह यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी सरसमकर सर , देशमुख सर आणि फलमारी सर यांच्यासह वालचंद कॉलेजचे सर्व शिक्षकवृंद, सहकारी आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी परिसरात स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला .



