करमाळा ते केतुर बस सेवा सुरु; प्रा. रामदास झोळ सर यांच्या प्रयत्नांना यश

करमाळा ते केतुर बस सेवा सुरु; प्रा. रामदास झोळ सर यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ४/ करमाळा ते केत्तूर जाण्यासाठी विद्यार्थी व नागरिक यांना एस.टी बस नसल्यामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे करमाळा ते केतुर बस चालू व्हावी यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांनी करमाळा बस डेपो चे आगार व्यवस्थापक होनराव साहेब यांच्याकडे मागणी केली होती. आज प्रत्यक्षात बस सुरू झाली. त्यामुळे नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली.
बस गावात दाखल झाल्यावर बसची पूजा करण्यात आली आणि चालक वाहक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, केत्तूर गावचे सरपंच सचिन विठ्ठल वेळेकर, उपसरपंच भास्कर भगवान कोकणे, दादासाहेब यशवंत कानतोडे, चंद्रकांत साहेबराव पाटील, बसचे चालक श्री रामचंद्र धुमाळ, वाहक नवनाथ जाधव, योगेश कोकणे, दत्तकला आयडियल स्कूल चे प्राचार्य मारकड सर, सोमा शिंदे सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. उपस्थितांनी करमाळा बस डेपोचे आगार व्यवस्थापक होनराव साहेब, शिक्षणाधिकारी नलवडे साहेब तसेच प्रा. रामदास झोळ सर यांचे आभार मानले.