ऐनवेळी अवकाळी पाऊस तर गटारीच्या घाणीमुळे नागरीकांचा आरोग्यांचा प्रश्न* :- *दिपक पाटील वाघोदेकर*

*ऐनवेळी अवकाळी पाऊस तर गटारीच्या घाणीमुळे नागरीकांचा आरोग्यांचा प्रश्न* :- *दिपक पाटील वाघोदेकर*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरातुन एका मागे एक समस्या चालूच आहे.श्री कृष्ण मंदिर वड चौक मोहाडीकर प्लाॅट जवळ तसेच प्रत्येक काॅलनी तुन रोज एखादं समस्या चालूच असते. एवढी सर्व श्रेष्ठ असलेली अमळनेर भुमी अस्वच्छता करून ठेवली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.यामुळे लहान लहान चिमुकल्या वर परीणाम होत आहे.नागरीक या दुर्गंधी मुळें त्रस्त झाले आहेत अक्षरशः दुर्गंधी मुळें होणारे डासांची उत्पत्ती वाढ झाली आहे.
नागरीक आता यांविषयी महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन ला प्रश्न करत आहेत की या वर उपाययोजना कोण करणारं आहे.कारण जनतेच्या सेवेसाठी कोणी तरी असले पाहिजे.असे खळबळ जनक वृत्त नागरिकांडून समोर येत आहे.महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन जळगावजिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांच्याकडे तक्रार केलेली असुन ते आता यावर लवकरात लवकर तोडगा काढतील.