Breaking
ब्रेकिंग

कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजु करा – – श्रीमती मुन्नाताई चावरे

अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस ने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले निवेदन

0 4 3 3 7 3

कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजु करा – – श्रीमती मुन्नाताई चावरे

अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस ने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले निवेदन

राष्ट्रप्रथम न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : शिर्डी नगरपरिषद अंतर्गत कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजु करणे बाबत अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्या वतीने मा. सहाय्यक कामगार आयुक्त साहेब,अहिल्यानगर यांना मंगळवार दि . १० जुन रोजी निवेदन देण्यात आले .

निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी नगरपरिषद शिर्डी अंतर्गत कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचारी १) सरिता हरी गुंजाळ, २) अनिता सिताराम कुसाळकर, ३) सिंधूबाई देविदास अहिरे या महिला युनियनच्या सभासद असुन १० ते १२ वर्षांपासून शिर्डी नगरपरिषद अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बी.व्ही.जी. इंडिया लि. या ठेकेदार कंपनी मार्फत दि. ०१/१२/२०१७ ते जुन २०२५ पर्यंत काम केलेले आहे. जुलै २०२५ मध्ये बी.व्ही.जी. इंडीया लि. कंपनीचा ठेका बदलून मे. दिपक एल. उत्तराधी अमरावती या ठेकेदार कंपनीस ठेका देण्यात आला. सदर ठेकेदारामार्फत या महिला कर्मचारी कार्यरत असताना कंपनीने कोणत्याही प्रकारची कारणे न सांगता व लेखी पुर्व सुचना न देता तोंडी आदेशाने दि. ०१/०४/२०२५ रोजी सदर महिला कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे कामावरुन काढले . ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने या महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असुन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण सदर तक्रारी अर्जाचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन मे. दिपक एल. उत्तराधी, अमरावती या ठेकेदार कंपनीला सदर महिला कर्मचाऱ्यांना पुर्ववत कामावर रुजु करणेबाबत आदेश पारीत करावेत अशी विनंती करण्यात आली आहे .

श्रीमती मुन्नाताई चावरे अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्या सरचिटणीस असून अत्यंत धडाडीने त्या जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत असतात .२०२१ पासून त्या कामगारांच्या न्याय हक्का साठी लढा देत आहेत . कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी दुसऱ्या संघटनेच्या मध्यस्थी मुळे संबंधीत ठेकेदाराने काही कर्मचारी कमी केले आहेत . श्रीरामपूर, देवळाली शिर्डी आदी भागांत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . काही कारण नसताना त्यांना कामावरून कमी केले जात आहे . याविषयी आवाज उठवुन त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे श्रीमती मुन्नाताई चावरे यांनी सांगितले .

यावेळी निवेदन देताना ज्योती थोरात , नंदा पंडित, मथुरा सूर्यवंशी , सुनिता सरोदे , कमल बर्डे , सरिता गुंजाळ , अनिता कुसाळकर, सिंधुबाई आहिरे आदि महिला उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे