Breaking
ब्रेकिंग

दत्त जयंती उत्सव ओढ्यातील दत्त मंदिरात संपन्न

0 3 9 1 1 6

दत्त जयंती उत्सव ओढ्यातील दत्त मंदिरात संपन्न

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

नगर-मधील नगर पुणे रोडवरील ओढ्यातील दत्त मंदिर,गोंडाळ मळा,चास येथे दत्त जयंती निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उत्सवा निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळाची सांगता झाली . दत्त जयंतीला सकाळी ८ वा श्रीं दत्तगुरूंचा महाअभिषेक सोहळा,होम हवन नंतर दुपारी भजन कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी ४ वा प्रसाद महाराज देव,शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज यांचे एकनिष्ठ भक्त नरहर सिद्ध(दादास्वामी)यांचे १३ वे वंशज यांच्या मधुर वानिने श्री दत्त संगीत जन्म कथा व दत्त नामाचा नामजप होऊन सायंकाळी ठीक ६ वाजता श्रींचा पाळणा व जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दत्त जन्म झाल्या नंतर सायं ७ ते ९ भजन संपन्न झाले.तसेच दिवसभर साबुदाणा खिचडी चा महाप्रसाद वाटप झाले .
रविवारी दुपारी १२ वाजल्या पासून सायंकाळी ५ वाजे पर्यंत महाप्रसाद संपन्न झाला, दोन दिवसीय कार्यक्रमासाठी शहरांसह राज्यातून भाविक,भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते , सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी गर्दी केली होती तर परिसरात विविध दुकाने व खेळणी होती केडगावच्यापुढे असलेले हे मंदिर पुरातन क्षेत्र असून येथे दत्त महाराजांच्या दगडी स्वयंभू पादुका आहेत ओढ्यात असून दोन्ही बाजूने डोंगर आहे व मध्ये दत्तक्षेत आहे, गेली अनेक वर्षे येथे उत्सव साजरा केला जातो व २० वर्षांपूर्वी येथे मोठ्या स्वरूपात मंदिर बांधण्यात आले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे