Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथे रविवारी २९ डिसेंबर ला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

0 3 9 0 8 0

करमाळा येथे रविवारी २९ डिसेंबर ला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २५/ करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ -२५ रविवारी २९ डिसेंबर २०२४ रोजी होणारं आहे. या परीक्षेसाठी पूर्ण करमाळा तालुक्यातील जवळ जवळ 40 विद्यालयात प्रथम पूर्व परीक्षा घेऊन त्यातून प्रत्येक विद्यालयातून १०ते १५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची मुख्य परीक्षा २९डिसेंबरला करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परीक्षा केंद्र ठेऊन पार पडते. आज सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरातून अनेक विद्यार्थी दरवर्षी आनंदात या परीक्षेस सहभागी होतात.

करमाळा शहरात नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चा प्रयत्न असतो. या परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण 5 जानेवारी रोजी विकी मंगल कार्यालय येथे होणार असून या दिवशी सर्व विद्यार्थी व पालक यांना श्री सोपान कनेरकर यांचे न समजलेले आई बाप या विषयावर धडाकेबाज व्याख्यान आयोजित केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे