देवांना वाकोल्या दाखवत गुलाल उधळून पालखी उत्सवाची सांगता*

*देवांना वाकोल्या दाखवत गुलाल उधळून पालखी उत्सवाची सांगता*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पालखी मिरवणूक १२ रोजी रात्री १० वाजता बोरी नदीतील समाधी स्थळावर पोहचली. त्यावेळेस प. पू. प्रसाद महाराज यांनी अभंग म्हणून देवाना सांगितले की बघा आम्ही पृथ्वी तलावर किती छान सोहळा केला आहे. त्यावेळेस देवांना सुध्दा वाकोल्या दाखवण्यायात आल्या. आणि गुलाल उधळून आनन्द व्यक्त करण्यात आला. समाधी मंदिराजवळ पालखी मिरवणूक आल्यावर विठ्ठल नामाचा मोठा गजर करण्यात आला. गुलाल उधळण्याच्या कार्यक्रमाला श्रद्धेने विशेष महत्व आहे. स्वतः प्रसाद महाराजानी आपल्या भक्ताच्या अंगावर गुलाल फेकला. गुलाल आपल्या अंगावर पडला म्हणजे भक्त स्वतःला भाग्यवान समजतात. प्रसाद महाराज व भक्तांनी आनन्द व्यक्त केला. त्यांनतर हवेत आकाशाकडे बघून रुमाल हलवून देवांना वाकोल्या दाखवल्या. आम्ही पृथ्वीतलावर आनंदाने सोहळा साजरा केला हे देवांना कळवण्यासाठी परंपरेप्रमाणे वाकोल्या दाखवल्या. प्रसाद महाराजांनी भजन म्हणून भक्तांना प्रसाद वाटप केला. दुसऱ्या दिवशी १३ रोजी सकाळी मोहन बेलापूरकर महाराज यांचे केल्याचे कीर्तन झाले आणि यात्रेची सांगता झाली. मात्र नदी पात्रातील यात्रा सुरू आहे.